breaking-newsराष्ट्रिय

पीएनबी घोटाळा ; नीरव मोदीचे लंडनमध्ये वास्तव्य

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून विदेशात फरारी झालेला भारतातील हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. नीरव मोदीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असला तरी सध्या तो सिंगापुरच्या पासपोर्टवर विदेशात मुक्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ निशाल मोदी आणि बहीण पुर्वी मेहता यांच्याकडे बेल्जियमचे पासपोर्ट आहेत.

पुर्वीचा नवरा मयंक मेहता याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून तो सध्या न्युयॉर्क ते हॉंगकॉंगच्या फेऱ्या मारीत आहे असेही समोर आले आहे. नीरवचे वडील दीपक मोदी, भाऊ निशाल मोदी, बहीण पूर्वी मेहता आणि तिचा पती मयांक मेहता यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. नीरवचा अमेरिकास्थित व्यावसायिक भागीदार मिहीर भन्साळी याचाही समन्स बजावण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. नीरवचे व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जोडले गेलेले असल्याने त्यांची चौकशी आवश्‍यक असल्याचे ईडीने म्हटले आहे. समन्स बजावण्यात आलेले पाचही जण परदेशांत राहतात. त्यामुळे त्यांना ई-मेलच्या माध्यमातून समन्स बजावण्यात आले.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही प्रक्रिया करण्यात आली. दीपक मोदी बेल्जियममध्ये, मेहता दाम्पत्य हॉंगकॉंगमध्ये तर निशाल आणि भन्साळी अमेरिकेत असल्याचा अंदाज आहे. याआधी ईडीने नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांना समन्स बजावले होते. मात्र, व्यावसायिक कामे आणि पासपोर्ट स्थगितीची कारणे देत त्यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button