breaking-newsराष्ट्रिय

पीएनबीच्या बुडित कर्जाचे प्रमाण गेले 15,199 कोटी रूपयांवर

नवी दिल्ली- नीरव मोदी प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या बुडित कर्जाचे प्रमाण नवीन आकडेवारीनुसार आता 15 हजार 199 कोटी रूपयांवर गेले आहे. एप्रिल अखेर पर्यंतचा जो डाटा बॅंकेने प्रसारीत केला आहे त्यात हे बुडित कर्जाचे म्हणजेच एनपीएचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे.

सन 2018-18 च्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत बुडित कर्जाचे प्रमाण 13 हजार 400 कोटी रूपये इतके असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता एप्रिल अखेर पर्यंतची जी माहिती देण्यात आली आहे त्यात हे प्रमाण 15 हजार 199 कोटींवर गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बॅंकेतील एकट्या नीरव मोदीचा फ्रॉड 14 हजार 357 कोटी रूपये इतका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button