breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक

पिंपरी |महाईन्यूज|

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा युनीट चारच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सहा पिस्तूल व पंधरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

गणेश मारुती माळी (वय 26 राहणार महादेव मंदिराजवळ जुनी सांगवी) , ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गित्ते (वय 30 रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर कालुसिंग जसवंत सिंग (राहणार मध्य प्रदेश) हा फरारी आहे. यातील गित्ते याच्यावर विविध स्वरूपाचे 23 गुन्हे दाखल आहेत. तो परळी वैजनाथ येथे फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करीत आहे. तर माळी हा वाकड येथील एका शोरूम मध्ये बाऊन्सरचे काम करीत आहे. दरम्यान पोलिसांकडून शहरात बाउन्सर तसेच फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करणाऱ्या व्यक्तींची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button