breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमधील बंदिस्त नाला प्रकरण ; एकाच प्रभागातील भाजप नगरसेवकांमध्ये पडले दोन गट

एकाच कामांचे दोन वेळा उद्घाटन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकांमधील सुप्त संघर्ष हळूहळू आता चव्हाट्यावर येवू लागला आहे. यामध्ये पिंपळे निलख प्रभाग क्रमांक 26 मधील कस्पटेवस्तीतील नाला बंदिस्त करण्याच्या कामांचे दोन वेळा उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांतील वाद किती वाढल्याचे यावरुन दिसू लागला आहे. 

पिंपळे निलख-वाकड प्रभाग क्रमांक २६ मधील कस्पटेवस्तीतील आण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चाैकपर्यंतचा नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याची नागरिकांनी केली होती. त्यानूसार तेथील स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करुन नाला बंदिस्त होण्यासाठी प्रयत्न केल्याने या कामाला मंजूरी मिळाली. या बंदिस्ती नाल्यामुळे अनमोल रेसीडेन्सी, धनराज पार्क, शील कॅलेस्टा, डॅंनेस्टी, निसर्ग दिन, नवदीप, मालपाणी ग्रीन्स यासह अनेक सोसायटींना दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.

मात्र, एकाच प्रभागातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी चक्क दोन वेळा त्या कामाचे उद्घाटन केले आहे. पिंपळे निलखमधील डायनँस्टी सोसायटी शेजारील १ कोटी ३७ लाखाच्या या कामाचे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्धाटन होणार होते. मात्र लक्ष्मण जगताप हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे स्थायी सभापती ममता गायकवाड आणि त्यांचे पती विनय गायकवाड यांनी घाईघाईत या कामाचे उद्धाटन शनिवार दि.२९ उरकून घेतले.

या उद्धाटनाची कोणतीच कल्पना गायकवाड यांनी स्वपक्षीय भाजपच्या स्थानिक नगरसेवकांना दिली नाही. त्यामुळेच नाराज झालेले भाजपाचे नगरसेवक संदीप कस्पटे यांनी आज (रविवार दि.३०) तातडीने पुन्हा त्याच कामाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले.  यावेळी स्थानिक नगरसेविका आरती चोंधे, तुषार कामठे, यांच्यासह  शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यामुळे  भाजप पक्षातील नगरसेवकांमध्ये होत असलेले कुरघोडीचे राजकारण या उद्धाटनावरून चव्हाट्यावर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button