breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी ते निगडी मेट्रो मंजूर करावे, मनसेचा आंदोलनाचा इशारा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून दापोडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्पाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. पिंपरी ते निगडी असा मेट्रोचा टप्पा व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड मनसे आग्रही असून शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने मेट्रो लाइनचा पहिला टप्पा हा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पिंपरी ते निगडी प्रकल्प अहवालास मार्च, 2019 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. तो प्रकल्प अहवाल राज्य शासन व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी व मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी आवश्यक आहे. पण, ती अद्याप मिळालेली नाही. हा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या दरबारी पडून असून त्याचा आपण पाठपुरावा करावा व तो मंजूर करून घेण्यात यावा, असे आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले.

सलग दोन ते चार वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना निगडीपर्यंत मेट्रो पहिल्याच टप्प्यात व्हावी यासाठी आग्रही आहे. निगडीपर्यंत मेट्रो मंजूर न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा मनसे चे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button