breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी ते निगडी डीपीआरचे दिवाळीनंतर सभागृहात सादरीकरण

– आयुक्त श्रावण हर्डिकरांची स्थायी समिती बैठकीत माहिती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी महापालिकेपासून निगडीच्या भक्ती-शक्ती चैाकापर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. त्याचे दिवाळीनंतर महापालिकेच्या सभागृहात सादरीकरण करण्यात येईल. तसेच या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी याठिकाणी मेट्रो स्थानके असणार आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी स्थायी समितीच्या आज ( मंगळवारी) झालेल्या बैठकीत सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहरात स्वारगेट ते चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल या मार्गावर पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. शहरातील विविध संघटनाकडून पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो नेण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. त्यास नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींनी पाठींबा मिळाला होता. महापालिकेने पिंपरी ते निगडीपर्यंत डीपीआर तयार करण्याचे निर्देश महामेट्रोस दिले होते. त्यानुसार सदर डिपीआर 6 महिन्यांच्या मुदतीत खासगी एजन्सीच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

महामेट्रोकडून डीपीआरचा अहवाल महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांना सादर केला आहे. याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पिंपरीच्या पुढे चिंचवड मदर तेरेसा उड्डाणपूल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो नेण्यात येणार आहे. हे अंतर सुमारे 7 किलोमीटर असून, त्या प्रकल्पासाठी एकूण 1 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 200 कोटींचा खर्च पालिकेस करावा लागणार आहे. तर, अर्धा खर्च केंद्र व राज्य शासन पेलणार आहे. उर्वरित खर्च महामेट्रो विविध माध्यमातून उभा करणार आहे.

दरम्यान, या मार्गावर चिंचवड, आकुर्डी व निगडी असे 3 मेट्रो स्टेशन असणार आहेत.‘कॉमन मोबॅलिटी प्लॅन’च्या अहवालानुसार या मार्गावरून वर्दळीच्या वेळेत एका तासात तब्बल 19 हजार प्रवासी मेट्रोचा लाभ घेणार आहेत. तसेच विविध बाबतीचे सर्वेक्षण केले आहे. या डीपीआरचे सादरीकरण महापालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांसमोर दिवाळीनंतर सादर करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button