breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शिवसेना गटनेत्याची पालिकेत उपस्थिती; पण आंदोलनाला ‘बगल’

  • बारणे-कलाटे गटबाजीमुळे शहर शिवसेनेला फटका
  • शहराध्यक्ष योगेश बाबर समन्वय साधण्यास अपयशी ?

पिंपरी | महाईन्यूज

गणेश विसर्जन व्यवस्थेच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर आरोप करीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सोमवारी (दि. 24) आंदोलन केले. मात्र, महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करणारे गटनेते राहूल कलाटे यांनी आंदोलनाला बगल दिली. याच दिवशी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीला कलाटे उपस्थित होते. पण, आंदोलनाकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे कलाटे-बारणे गटबाजी चव्हाट्यावर आली असून त्याचा फटका शहर शिवसेनेला बसत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे विद्यमान शहराध्यक्ष योगेश बाबर यांना शहरातील सर्व नेत्यांमध्ये समन्वय ठेवणे आणि सर्वांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यात अपयश येताना दिसत आहे. शिवसेनेची ही परिस्थिती बदलली नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची त्रेधातिरपीट उडेल, असे संकेत राजकीय जाणकारांनी वर्तवले आहेत.

राज्य शासनाने गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिकांना काही निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गणेशभक्तांची गर्दी होऊ नये, या उदात्त हेतून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदीघाटावर कडेकोट प्रतिबंद घातले आहेत. याला सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन दोषी असल्याचा कांगावा करत शिवसेनेने भावनीक मुद्याला हात घातला. याचे भांडवल करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी (दि. 24) आंदोलन केले. मात्र, या आंदोलनातून मनपा प्रशासनाची चूक बाजुलाच राहिली असून गणेशभक्तांना शिवसेनेतील गटबाजीचे मात्र प्रकट दर्शन घडले आहे.

शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या अनुपस्थितीत आंदोलन घेणे पक्षातील जबाबदार नेत्यांना शोभत नाही, असा सूर पक्षाच्या एका गटातून आवळला जात आहे. पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कलाटे यांना आंदोलनाबाबत कळवलेच नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाराज कलाटे यांनी या आंदोलनापासून दूर राहणे पसंत केल्याचे समजते. याची दुसरी बाजू अशी की, जर कलाटे आंदोलनात सहभागी होत नाहीत, तर त्यांचा प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा आहे की काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

यासंदर्भात शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांना विचारले असता ते म्हणाले, नियोजित आंदोलनाची माहिती पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कळविली होती. गटनेते कलाटे हे काही कारणास्तव आंदोलनात उपस्थित राहू शकले नसतील. सर्वांना पूर्वनियोजित माहिती कळवूनच पक्ष भूमिका निश्चित करत असतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button