breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा

  • 6 मे पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा निर्णय लागू

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणातील पाणीसाठा 29.93 टक्केपर्यंत पातळी आली आहे. तीव्र उन्हाने बाष्पीभवनामुळे हा साठा केवळ 2 महिने पुरणार आहे. पावसाने ओढ दिल्यास हा साठा पुरेसा ठरावा म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची 6  मे पासून अंमलबजावणी लागू करण्यात येणार आहे.

पवना धरणात केवळ 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेने पाण्यात कपात करून बचत करावी, असे वारंवार पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेस पाठविले होते. मात्र, पालिका प्रशासनाने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर स्मरणपत्र पाठवल्यानंतर  महापालिका प्रशासनाने दिवसाआड पाणी बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्के कपातीचे धोरण राबविले जाणार आहे.

सध्या धरणात 30 टक्केपर्यंत पाणीसाठा आहे. सध्याचा उन्हाची प्रखर तीव्रता पाहता हा साठा अडीच महिने म्हणजे 15 जुलैऐवजी केवळ 2 महिने म्हणजे 30 जूनपर्यंत पुरणार आहे. तसेच, पावसाळा लांबल्यास किंवा कमी पाऊस झाल्यास शहरावर पाणीसंकट ओढवण्याची शक्यता आहे. सध्याचा साठा 15 जुलैपर्यंत पुरावा म्हणून पालिकेने पाणी कपातीमध्ये वाढ करून पाणी बचतीमध्ये वाढ करावी, असे पत्र जलसंपदा विभागाने पालिकेस नुकतेच कळविले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने घेत शहरात दिवसाआड पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डिकर आणि महापाैर राहूल जाधव यांच्या आदेशानूसार शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 6 मे पासून एक दिवस आड पाणी पुरवठा सुरुवात करण्यात येणार आहे. पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापराले, तसेच घरातील व इमारतीमधील गळत्या बंद कराव्यात. रस्त्यावरील दृष्टीक्षेपातील गळत्या महापालिकेस कळविण्यात याव्यात, असे आवाहन केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button