breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

पिंपरी – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी आज शनिवारी (दि. 26) जाहीर करण्यात आली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी युवक राष्ट्रवादीच्या तब्बल 37 युवकांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

युवक उपाध्यक्षपदी किरण पवार, रुपेश मोरे, प्रशांत सपकाळ, सागर सुतार, पंकज चोपदार, ऋषिकेश तापकीर, विकास शेट्टी, सौरव घुले, श्रीकांत काटे, संदीप तरस, सचिन राऊत, विनायक काळभोर यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी नितिन कांबळे, अमित नांगरे, सचिन राऊत यांची निवड झाली आहे. संघटकपदी आकाश जाधव, मंगेश असवले, महेश किवळे, तुषार सोनवणे, शादाब खान यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी स्वप्निल तापकीर, संदीप अडसूळ, महेश चौधरी, हर्षद म्हेत्रे, महेश माने, गणेश फुंडे, रमनदिपसिंग कोहली, असिफ शेख यांची निवड झाली आहे.

सोशल मिडिया सरचिटणीसपदी शिवराज रणनवरे, रोहीत कदम, सौरभ साकोरे, संकेत दागट यांची निवड झाली आहे. चिंचवड विधानसभेच्या सरचिटणीसपदी किशोर पाटोळे, काशिनाथ तेलंग (दाताळकर), समीर साबळे, संघटक अभिलाष कांबळे, उपाध्यक्ष राहूल अंबवले यांची निवड झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button