breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तीन प्रभागात लवकरच पोटनिवडणूक

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तीन नगरसेवकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्या तीन नगरसेवकांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2021 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

महापालिका निवडणूक विभागाला अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन 12 मार्चला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. दत्ता साने (चिखली), जावेद शेख (काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी), लक्ष्मण उंडे (दिघी-बोपखेल) या नगरसेवकांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या जागा रिक्त असून पोटनिवडणूक होणार आहे.

अशा प्रसिद्ध होतील मतदार याद्या

-केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2021 पर्यंत प्रसिद्ध केलेल्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन.
-प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 16 फेब्रुवारीला प्रसिद्ध
-हरकती व सूचना 16 ते 23 फेब्रुवारीपर्यंत
-प्रभानिहाय अंतिम मतदार यादी 3 मार्च
-मतदान केंद्राची यादी 8 मार्चला प्रसिद्ध
– अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 12 मार्चला अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button