breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ अधिका-यांच्या कामकाजाचे फेरवाटप

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर आयुक्तांनी कामकाजाचे फेरवाटप केले. शासकीय सेवेतील उपायुक्त, सहायक आयुक्तांसह महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.

महापालिकेच्या नव्या आकृतीबंधानुसार तीन अतिरिक्त आयुक्त व आठ उपायुक्त पदे मंजूर झाली आहेत. पूर्वी केवळ दोनच अतिरिक्त आयुक्त होते. उपायुक्तपद प्रथमच निर्माण करण्यात आले आहेत. त्यावर महापालिका सेवेतील चार व राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या दोन सहायक आयुक्तांना बढती मिळाली आहे. त्यांच्या जोडीला यापूर्वीच राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले दोन उपायुक्त कार्यरत आहेत. प्रशासन अधिकारी संवर्गातील तीन अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी बढती मिळाली आहे.

या अधिका-यावर – ही सोपवली जबाबदारी
उपायुक्त

स्मिता झगडे : करसंकलन व अभिलेख विभाग, श्रीनिवास दांगट : ग प्रभाग क्षेत्रीय आयुक्त
चंद्रकांत इंदलकर : कामगार कल्याण, कायदा सल्लागार अतिरिक्त कारभार
संदीप खोत : क्रीडा विभाग

सहायक आयुक्त –

बाळासाहेब खांडेकर : आकाशचिन्ह व परवाना विभाग, निवडणूक (आधार योजना)
प्रशांत जोशी : भूमी-जिंदगी, माहिती व जनता संपर्क विभाग
अण्णा बोदडे : क क्षेत्रीय कार्यालय, जनगणना, नागरवस्ती विभाग दिव्यांग कक्ष
सुनील अलमलेकर : स्थानिक संस्था कर
राजेश आगळे : झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, प्रशासन विभाग अतिरिक्त कामकाज

प्रशासन अधिकारी –

दिलीप आढारी : करसंकलन मुख्य कार्यालय
वामन नेमाणे : प्रशासन विभाग
राजेश ठाकर : ग क्षेत्रीय कार्यालय प्रशासन अधिकारी

अतिरिक्त कारभार

सीताराम बहुरे : फ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी
अवधूत तावडे : ई क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी
सोनम देशमुख : ब क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी
सुचिता पानसरे : अ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी
अभिजित हराळे : ह क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी
नाना मोरे : क क्षेत्रीय कार्यालय प्रशासन अधिकारी

प्रभारी प्रशासन अधिकारी – परशुराम वाघमोडे : बांधकाम परवाना, अनधिकृत बांधकाम, स्थानिक संस्था कर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button