breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर पदाचा फाॅर्म्युला ठरला, अडीच वर्षात तिघांना प्रत्येकी आठ महिने मिळणार संधी

इच्छुकांनी नेत्यांचे झिजवले उंबरे, चिंचवडमधून सर्वाधिक मताधिक्य देणा-यांस महापाैर पद

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापाैर पद हे खुला प्रवर्ग महिलांना मिळणार आहे. यामुळे खुला प्रवर्गातून निवडून आलेल्या 21 महिला नगरसेवकेनी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे जावून महापाैर पद मिळावे, याकरिता जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी महापाैर पद हे प्रत्येकी आठ महिने या प्रमाणे तीन महिला नगरसेविकेना विभागून देता येईल का? यावर विचारविनिमय सुरु केला आहे. तसेच महापाैर पद हे चिंचवड विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य देणा-या प्रभागात देण्याबाबत विचार सुरु आहे. त्यामुळे महापाैर कोण होणार, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने एकहाती सत्ता मिळविली. शहराचे नवे कारभारी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून राम-लक्ष्मण या जोडगोळीने पालिकेवर पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलविले. त्यानंतर पहिल्यांदाच आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक च-होलीचे नितीन काळजे यांना भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. तर निष्ठावंत म्हणून एकनाथ पवार यांना सत्तारुढ पक्षनेतेपदाची धुरा सोपविण्यात आली.

राज्यातील भाजपची सत्ता असलेल्या कोणत्याही महापालिकेत सव्वा वर्षानंतर महापौर बदलला नाही, मात्र, स्थानिक कारभा-यांनी स्वताःच निर्णय घेवून पिंपरी-चिंचवडमध्ये महापाैर बदल करण्यात आला. त्यानंतर आमदार लांडगे यांचे दुसरे समर्थक चिखलीचे राहुल जाधव यांना महापौरपद दिले.

राज्यात अनेक महापालिकेत भाजप सत्ता असूनही त्यांनी महापौरांना अडीच वर्ष संधी दिली. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक कारभा-यांनी परस्पर निर्णय घेवून पहिल्या अडीच वर्षात दोघांना महापौरपदी संधी देण्यात आली. आता मात्र, हा अडीच वर्षाच्या कार्यकाळात तीन महिला नगरसेविकांना संधी देण्याच्या विचाराधिन आहेत. पहिले सव्वा वर्ष च-होलीचे नितीन काळजे आणि जाधववाडीचे राहुल जाधव यांनी दुस-या सव्वा वर्षात संधी देण्यात आली. त्यामुळे आता नवीन महापौरांना अडीच वर्षात सव्वा वर्ष दोघांनी संधी देणार की प्रत्येक आठ महिने या कालावधीनूसार तीन महिलांना संधी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button