breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ ‘आउटडेटेड’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेबसाइटवरील सर्व सेवांचे जुने अर्ज नमुने अपडेट करावेत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. मात्र, अद्याप बहुतांश विभागांनी माहिती अपडेट केलेली दिसत नाही.

विविध सेवांचे अर्ज नागरिकांना त्वरित उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटवर डाउनलोडमध्ये सीएफएस संगणक प्रणाली, विविध विभागांसाठी विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणाली आदी माहिती अपलोड केली आहे. त्यानंतर बहुतांश विभागांनी आपल्या विभागांशी संबंधित अर्जामध्ये, तसेच आवश्‍यक जोडावयाच्या कागदपत्रांच्या यादीमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे.

परंतु, ते केले गेले नाहीत. या वेबसाइटवरील ‘विभाग’ या पर्यायावर वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांचा फोटोच नाही. ‘ड’ आणि ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची माहितीही अपडेट नाही. जन्म-मृत्यू व अग्निशामक विभागाची तपशीलवार माहिती दिलेली नाही. पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व पशुवैद्यकीय विभागदेखील अपडेट नाही. याशिवाय डॉ. एस. एस. गोरे यांचेच नाव पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून अद्याप झळकत आहे. जलशुद्धीकरण केंद्राऐवजी ‘जलशुद्धीकारण’ असे अशुद्ध लेखन आहे. अनेक नगरसेवकांची नावानिशी माहिती उपलब्ध नाही.

विवाहनोंदणीसाठी विविध क्षेत्रीय कार्यालयांत वेगवेगळ्या स्वरूपाच्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. ऑनलाइन करण्यास अडचणी येतात. त्यादृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विवाहनोंदणी अर्ज व त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांसाठी सर्वसमावेशक एकत्रित अर्ज नमुना तयार करणे गरजेचे आहे.

त्यामुळे प्रत्येक विभागाशी संबंधित जे अर्ज नागरिकांसाठी वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचे अवलोकन करून त्यात काही बदल असल्यास सुधारित अर्ज त्वरित वेबसाइटवर अपलोड करण्यात यावेत. तसेच, नव्याने अपलोड करण्यात आलेल्या अर्जांची नमुना प्रत आणि सॉफ्ट कॉपी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button