breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापतींना ‘दे धक्का’

– महिला व्यावसाय प्रशिक्षणाची निविदा होणार रद्द
– महापालिका आयुक्त लवकरच घेणार निर्णय
– लाभार्थी महिलांना मिळणार थेट अर्थसहाय्य
(विकास शिंदे)
 
पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला व बालकल्याण योजनेतंर्गत महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातून वस्तीपातळीवर महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी ई-टेंडरिंग निविदा मागवण्यात आल्या. परंतु, त्याला महिला व बाल कल्याण समितीने विरोध दर्शविला. तसेच महिला व बालकल्याण समितीचे शिष्टमंडळ आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून महिलांना प्रशिक्षण देण्याऐवजी त्यांना व्यावसाय करण्यासाठी वस्तू स्वरुपात अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्याला आयुक्तांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी काढलेल्या  ई-टेंडरिंगची निविदा रद्द करण्याची नामुष्की नागरवस्ती विभागावर आली आहे. यामुळे स्थायी समितीच्या माजी सभापतींना चांगलाच धक्का मानला जात आहे.
 महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याणाच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी 2018-19 च्या अर्थसंकल्पात सुमारे 34 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमांतर्गत महिलांना 20 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात प्ले ग्रुप नर्सरी टिचर्स प्रशिक्षण,सुरक्षारक्षक प्रशिक्षण, सेंद्रिय खते व औषधे वनस्पतींची रोपे तयार करणे, यासह   रोजगारविषयक विविध प्रशिक्षणाबरोबरच कुशन कव्हर, डोअर मॅट, रजई तयार करणे, प्लास्टिक गॅन्युअल्स तयार करणे, महिलांना ओला, सुका व घातक कचरा याचे विलगीकरण, विविध प्रकारच्या कागदी वस्तू तयार करणे, मिठाई, पापड, लोणचे, केक तयार करणे, स्टेन ग्लास प्रिंटींग, फ्रेमिंग, स्पोकन इंग्लिश, व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, महिलांना किमान 25 ते कमाल 90 दिवसांच्या प्रशिक्षण वर्गांचा समावेश आहे. महापालिकेने प्रशिक्षण संस्थांसाठी नुकतीच निविदा प्रसिध्द केली आहे. वर्षभरात सुमारे 30 हजार महिला व मुलींना या योजनेतून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. परंतू, त्या प्रशिक्षणाला महिला व बालकल्याण समितीने विरोध दर्शवला असून, सदरील निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी घेतलेल्या निर्णयाला महिला बालकल्याण समितीने ‘ दे धक्का’ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
———–
महिला सक्षमीकरणासाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी ई-टेंडरिंग निविदा मागविण्यात आल्या. परंतू त्या प्रशिक्षणाला महिला व बालकल्याण समितीने विरोध दर्शविला आहे. महिलांना व्यावसाय करण्यासाठी वस्तू स्वरुपात साधन सामुग्री घेण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे महिला व बालकल्याण समितीच्या शिष्टमंडळाने केलेली आहे. त्यानूसार प्रशिक्षण देण्याचे ई-टेंडरिंग रद्द करण्यास आयुक्तांनी अनुकूलता दर्शली आहे.
– सुनिता तापकीर, सभापती, महिला व बालकल्याण समिती.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button