breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड भाजपाची सावध खेळी : महापौर माई ढोरे यांना मुदतवाढ?

  • इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कारभाऱ्यांना चिंता
  • नाराज नगरसेविका माया बारणे यांच्या राजीनाम्याने धास्ती

 

पिंपरी । अधिकराव दिवे-पाटील

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये राजकीय भूकंपाचे संकेत आहेत. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चार-पाच नगरसेवकांनी ‘कारभारी’ नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेत विद्यमान महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना मुदतवाढ देण्याबाबत खलबते सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत आल्यानंतर २०१७ मध्ये सर्वच भाजपा नगरसेवकांना विविध पदांवर संधी देण्याबाबत नियोजन करण्यात आले. त्यानुसार एक वर्ष- एक पद असा फॉर्म्युला ठरला. एक नगरसेवक- एक पद अशा नियोजनाप्रमाणे सुरूवातील दोन-तीन वर्षे अनेकांना मोठ्या आणि मानाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली.

मात्र, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जवळपास एक वर्ष महापालिकेचा कारभार ठप्प झाला होता. सर्वच विषय समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. परिणामी, अनेक इच्छुक नगरसेवकांना दिलेला ‘शब्द’ शहर भाजपाचे कारभारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना पूर्ण करता आला नाही. त्यातच राजकीय गणिते मांडत असताना काहींना दोन-दोन पदांचा लाभ द्यावा लागला. इच्छुकांच्या अपेक्षा पूर्ण करताना दोन्ही कारभाऱ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली.

संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न…

दरम्यान, भाजपातील सुमारे २५ ते ३० नगरसेवकांचा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सुरू झाली. शहरातील राजकीय स्थिती, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि नगरसेवकांच्या अपेक्षा यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी संयमाने निर्णय घेण्याची भूमिका ठेवली आहे.

महापौर, स्थायी सभापतींसाठी जातीय गणित…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे या मराठा समाजाच्या आहेत. शहरातील मराठा समाज आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यासोबत रहावा, यासाठी मराठा समाजाचा चेहरा म्हणून ढोरे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे माळी समाजाचे आहेत. शहरातील माळी समाज हा निर्णायक मतदार आहे. त्यामुळे लोंढे यांनासुद्धा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौरपदी संधी देत समाविष्ट गावांना न्याय देण्याची प्रयत्न केला आहे. तसेच, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, ममता गायकवाड यांच्यासह विलास मडिगेरी यांना संधी देत भाजपा नेत्यांनी त्या-त्या समाजाला सोबत ठेवण्याची भूमिका ठेवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button