breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता, हे उद्योग राहणार सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये उद्यापासून काही शिथिलता देण्यात आली आहे. उद्या रविवार (दि. 19) किरकोळ विक्रेत्यांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुबा देण्यात आली आहे. सोमवार (दि. 21) ते बुधवार (दि. 23) या व्यवसायिकांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. यासंदर्भातील आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केला आहे.

१९ ते २३ जुलै दरम्यान हे उद्योग राहणार सुरू

१) सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक १४/०७/२०२० ते १८/०७/२०२० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक १५/०७/२०२० ते २३/०७४२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील, इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.

२) सर्व किरकोळ व ठोक विकीचे ठिकाणे मोडा / मंडई, आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक १४/०७/२०२० ते १८/०७/२०२० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक १ ९ / ०७ / २०२० ते २५/०७/२०२० या कालावधीत शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांने विकी करणारे अधिकृत फेरीवाले यांचे मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहील.

३) मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दिनाक १९ / ०७ / २०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चाल राहतील. परंतु लॉकड़ाऊन शिथील होताना दुकानांमध्ये / बाजारपेठेत होणाऱ्या संभाव्या गर्दीचा विचार करता कोबिद्ध -१ ९ चे संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी फक्त दिनांक १९ / ०७ / २०२० रोजी उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधिल सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी 8 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालु राहतील.

तसेच दिनांक २०/०७/२०२० ते २३/०७/२०२० पर्यंत उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधिल सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी १२ वाजे पर्यंत चालु राहतील. तसेच संदर्भ क्र. ६ ते ८ मधिल उर्वरीत तपशिलामध्ये कोणताही बदल नाही. उपरोत्त, आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द कोणतीही, व्यक्ती, संस्था, भारतीय दंड संहितेच्या कलम १४८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ याची कलमे ५१ ते ६० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यास पात्र असतील, वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असताना कोविड -१ ९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते कृत्य व सद्हेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरोधात कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही खटला दाखल करता येणार नाही. (आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ७३) उपरोक्त, नमूद ठिकाणे, संबंधित व्यक्ती, आस्थापना, मालक / बालक / आयोजक । व्यवस्थापक / कार्यालये इत्यादी यांना प्रत्येकास स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने साथरोग नियंत्रण अधिनियम, १८९७ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button