breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये यावर्षी ठिकठिकाणी तुरटीच्या गणपतीची प्रतिष्ठापना

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा अनुकरणीय उपक्रम

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचाही पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, तसेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही या उपक्रमात पुढाकार घेतला आहे.
पिंपळे गुरव येथील जयगणेश मित्र मंडळाला आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते श्रीं ची मूर्ती सपूर्त करण्यात आली. तसेच, आमदार लांडगे यांच्याहस्ते भोसरी येथील श्रीराम मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना श्रींची मूर्ती भेट देण्यात आली. दरम्यान, शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा लांडगे यांच्याहस्ते भोसरी परिसरातील पाच गणेश मंडळांना अशा मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी दिली.
तसेच, महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर , भोसरी, चिंचवड, पिंपळे निळख ,पिंपरी, शाहूनगर, चिखली, तळवाडे, प्राधिकरण येथील गणेश मंडळांना मूर्ती देण्यात आली
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका आरती चोंधे, उषा मुंडे, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, महिला पदाधिकारी सोनम मोरे, कुंदाताई भिसे, राजश्री मोरे, कांचनताई काटे, अश्विनीताई तोरखडे, दिपाली करंजकर, नंदा करे, आशा मटंगे आदी उपस्थित होते.


पर्यावरणपूक गणेशोत्सवाचे आवाहन…
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूक गणेशोत्सव साजरा करावा. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक टाळावी. यावर्षी विसर्जन घाट सुविधा नाही. त्यामुळे गणेशभक्तांनी घरच्या घरीच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे. प्रशासन आणि पोलीस बांधवांना सहकार्य करावे. गर्दी टाळावी. तसेच, ‘वृक्ष गजाजन’, शाडु किंवा तुरटीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button