breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये महिलेने रांगोळीतून साकारली हुबेहुब पैठणी

महाईन्यूज |पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये रांगोळीचा छंद जोपासणाऱ्या एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी रेखाटली आहे. त्यांना ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले आहेत. विजयमाला उदय पाटील असं या गृहिणीचं नाव आहे व

नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी ही रांगोळी त्यांनी साकारली आहे. त्यांनी रागोळीच्या माध्यमातून तयार केलेली पैठणी पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली आहे.

विजयमाला पाटील या पिंपरी-चिंचवड शहरात राहातात. त्यांना रांगोळी काढण्याचा छंद लहानपणापासूनच होता. लग्न झाल्यानंतर आपला हा छंद जोपासला. छंद जोपासण्यासाठी पती उदय पाटील यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं, असं त्या सांगतात. विजयमाला यांना काही तरी वेगळं करून दाखवायचं होतं. त्यांनी यापूर्वी अशा प्रकारची मोठी रांगोळी कधीही काढली नव्हती. त्यांना गालीचा किंवा पैठणी रांगोळीतून साकारायची होती. फोटो पाहून हुबेहूब त्यांना पैठणी काढायची असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी घरातील हॉल उत्तम पर्याय होता. पती उदय आणि मुलगा हे बाहेर गेल्यानंतर त्या मिळेल त्या वेळेत पैठणी रेखाटत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button