breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये पुरोगामी राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याचे सोवळे-ओवळे? (पहा व्हीडिओ)

शांती, वास्तूप्रवेश अन्‌ गणेश प्राणप्रतिष्ठासह विधीवत सत्यानारायण पूजा

उपमुख्यमंत्री अजित पवार संबंधित नेत्यावर काय कारवाई करणार?

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांच्या मार्गदर्शक सूचनाचे उल्लंघन

पिंपरी । प्रतिनिधी

देशात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्वेसर्वा शरद पवार पुरोगामी महाराष्ट्राचा ढोल बडवित आहेत. प्रतिगामी विचारांचा कायम

विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या विचारधारेला गालबोट लागेल अशी कृती नवनियुक्त विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली. मिसाळांनी पुरोगामी विचारांची धुळधाण तर उडवलीच पण शासकीय कार्यालयांत धार्मिक सोहळे करण्यास मनाई असतानाही नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला वेठीस धरून मिसाळ सोहळे-ओवळे करण्यात गुंतले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काम करीत आहे. पक्षाच्या महापालिकेतील गटनेत्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षनेता म्हणून राजू मिसाळ यांना संधी दिली आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी मिसाळ यांनी आपल्या दालनाचा विधीवत वास्तूशांती केली. त्यानंतर श्री गणेश प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सत्यनारायण पूजा त्यानंतर मंत्रोच्चारण करण्यात आले. मात्र, महापालिका भवन अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयात धार्मिक विधी करता येणार नाहीत, असा नियम आहे. या नियमाचे मिसाळ यांनी पहिल्याच दिवशी उल्लंघन केले.

शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी यावर्षी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन राज्य, केंद्र सरकारसह स्थानिक प्रशासन करीत आहेत. गणेशोत्सव यंदा घरातच साजरा झाला. राज्यातील मंदिरे बंद आहेत. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर पूजन सोहळा केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी राम मंदिरापेक्षा आम्हाला कोरोना संकटात उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असे वक्तव्य केले होते. त्याच राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ शहरात कोरोनाची परिस्थिती असताना त्यावर उपाययोजना सूचवण्याऐवजी धार्मिक विधी, पूजा अर्चा करुन नियमांचे आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे उल्लंघन करीत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button