breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौर पदासाठी भाजपातील ‘गट’ सक्रीय!

कोणाला मिळणार संधी…याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

घोळवे, लांडगे, घुले, कामठे, कस्पटे, गायकवाड, बोराटे, शेडगे चर्चेत

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतील उपमहापौरपदासाठी ‘गट-तट’ सक्रीय झाले आहेत. जुना गट, दादा-भाऊ समर्थकांनी आपआपल्या ‘ज्येष्ठां’कडे फिल्डिंग लावली आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले.
उपमहापौरपदाची निवडणूक ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. यासाठी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेच्या पीठासन अधिकारीपदी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांची निवड विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे.
मावळते उपमहापौर तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. सत्ताधारी भाजप उपमहापौरपदी कोणाला संधी देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर भाजपा नेत्यांनी एक पद- एक नगरसेवक – एक वर्ष असे सूत्र तयार केले. त्यामुळे बहुतेक नगरसेवकांना विविध पदांवर काम करण्याची संधी देण्यात येत आहे.
आगामी निवडणुकीसाठी अवघा दीड वर्षांचा कालावधी राहीला आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांना कार्यकाळ गाजवता आला नाही. त्यातच विषय समित्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे सात-आठ महिन्यांच्या काळात पदवाटप करता आले नाही.
आता नवीन उपमहापौरांना १४ महिन्यांचा काळ मिळणार आहे. पक्षश्रेष्ठींनी मनात आणल्यास सात- सात असे दोन टप्पे करुन दोघांची वर्णी लावण्यात येवू शकते. त्यामुळे भाजपातील गट-तट कामाला लागले आहेत.

जुन्या गटातून घोळवे, लांडगेंची चर्चा…
जुन्या गटातून नगसेवक केशव घोळवे आणि रवि लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. घोळवे हे माजी खासदार अमर साबळे यांचे निकटवर्ती आहेत. तसेच, लांडगे यांनी २०१७ च्या निवडणुकीत बिनविरोध होत भोसरीतून विजयी सलामी दिली होती. तसेच भाजपाचे नेते कै. अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे दोघांबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.

जगताप समर्थकांमध्ये घुले, कस्पटे आणि कामठेही…
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक असलेल्या नगरसेविका हिरानानी घुले, नगरसेवक संदीप कस्पटे आणि तुषार कामठे यांच्या नावाची चर्चा आहे. वास्तविक, कामठे यांनी अनेकदा महापालिकेत चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात रान तापवले आहे. त्यामुळे या तिघांबाबत कोणाला संधी मिळते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लांडगे समर्थकांमध्ये लांडगे, गायकवाड आणि बोराटे…
भोसरी विधानसभचे आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका सारिका लांडगे, निर्मला गाकवाड यांची नावे चर्चेत आहेत. तसेच, मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांनीही आमदार लांडगे यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

आशा शेंडगेंसाठी सीमा सावळेंचा आग्रह…
सत्ताधारी भाजपाच्या पहिल्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या समर्थक असलेल्या आशा शेंडगे यांना उपमहापौरपदासाठी संधी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पक्षाच्या श्रेष्ठींकडे त्यांनी आग्रह धरला आहे, अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button