breaking-newsपुणे

पिंपरी-चिंचवडमधील तोडफोडप्रकरणी ४१ जणांवर गुन्हा

पिंपरी – पिंपरीतील भारतमातानगर, खराळवाडी आणि बौद्धनगर रिव्हर रस्ता, तसेच शगुन चौक परिसरात विविध कारणास्तव तरुणांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये ३८ वाहनांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री घडलेल्या या विविध तीन घटनांप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
खराळवाडीतील पहिल्या घटनेप्रकरणी योगेश नामदेव वेताळ (वय २७, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सुमारे ७५ हजारांचे नुकसान केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटी तपास करीत आहेत. काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या घटनेत शगुन चौकातून जयंतीची मिरवणूक जात असताना, सुमीत सूर्यवंशी (वय १९) यास आरोपींनी पूर्वीच्या भांडणाच्या रागातून डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच घरात घुसून टीव्ही, कपाट फोडले. तिसºया घटनेत बौद्धनगर इमारत क्रमांक १६च्या मागे मिरवणुकीत नाचू दिले नाही, म्हणून राग आल्याने परिसरातील पाच मोटारींचे नुकसान केले. अरुण अर्जुन वाघमोडे (वय ३७, रा. सुभाषनगर) यास पकडून हाताने मारहाण केली. खिशातील २२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तीन घटनांमध्ये वाहनांचे सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button