breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांना आता सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मुदत, आयुक्तांचा आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराला महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊनमधून आणखी दिलासा दिला आहे. सोमवारी काढलेल्या आदेशानुसार आता शहरातील सर्व बाजारपेठातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील. त्यासाठी पी १, पी २ तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुस-या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. बाजारपेठामध्ये ज्या बाजुची दुकाने सुरु असतील त्याच्या विरुध्द बाजुस वाहनांचे पार्किंग करण्यात यावे, जेणेकरुन दुकानांसमोरील जागा शारिरीक / सामाजिक अंतराच्या निकषासह ग्राहकांना वापरता येईल.

शहरातील नागरिकांसाठी सर्व उद्याने / बागा सकाळी ५.०० ते सकाळी ८.०० आणि दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत खुली राहतील. तथापि अशा ठिकाणी फक्त वैयक्तीरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळायचे खेळ उदा. जॉगींग, धावणे, चालणे, योगासने, दोरीवरच्या उड्या इत्यादीना मुभा राहिल. प्रेक्षक व सामुहिक उपक्रम, सांघिक खेळ, खेळाचे साहित्य, एका पेक्षा जास्त खेळाडूनी हाताळायची शक्यता असलेले सर्व खेळ यांना परवानगी असणार नाही.

पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक, आय टी, खाजगी, आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहणेसाठी प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरक्त भागातून शहराबाहेरुन येणाऱ्या कर्मचा-यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात येताना चार चाकी, वैयक्तिक वाहन किंवा कंपनीचे वाहन असल्याबाबत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र (Self Declaration) स्वयं घोषणापत्र अति. आयुक्त ( २ ) यांचेकडे पाठवून परवानगी घेता येईल, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button