breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीसह पुणे कँटोन्मेंट जागा भाजप-शिवसेनेकडे, रिपाइंला दाखविला ठेंगा

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा करत महायुतीत पुणे कँटोन्मेंट व पिंपरीसह दहा जागांची मागणी करणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षालाही भाजप-सेनेने ठेंगाच दाखविला आहे.

पुण्यातील कँटोन्मेंट आणि पिंपरीची आग्रही मागणी करणाऱ्या रिपाइंला भाजप-सेनेने वाटाण्याच्या अक्षता दाखवित आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुणे कँटोन्मेंटमधून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांचे नाव जाहीर केले आहे, तर पिंपरीतून शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबूकस्वार यांचे नाव जाहीर केले आहे. या दोन्ही जागांची मागणी रिपाइंकडून केली जात होती.

गेल्या बारा वर्षांपासून प्रामाणिकपणे युतीधर्म पाळत शहरात भाजपचे खासदार, आमदार आणि महापालिकेत सत्ता आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला, तरी सत्तेत वाटा मिळाला नसल्याची नाराजीही रिपाइंच्या शहर पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही भाजप-सेनेने सत्तेचा वाटा न देता रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button