पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार
पिंपरी | महाईन्यूज
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करुन तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केला. महिलेने हातउसने दिलेले पैसे परत मागितले असता तिला मारहाण केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहिदास नथु खाटपे (रा. गंगाधाम रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला धमकी देऊन व लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. महिला गरोदर राहिली असता आरोपीने धमकावून महिलेचा तीनवेळा गर्भपात केल. असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
महिलेने आरोपी रोहिदास याला हातउसने १५ लाख रुपये दिले होते. ते पैसे महिलेने मागितले असता महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.