breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत दिवंगत महापाैर भिकू वाघेरे-पाटील प्रतिष्ठानतर्फे ‘श्रीमद् भागवत कथा’चे आयोजन

 – प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांची माहिती 
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  दिवंगत महापौर भिकू वाघेरे-पाटील  प्रतिष्ठानतर्फे पिंपरीतील भैरवनाथ चौकात 22 ते 28 जानेवारीला दररोज सायंकाळी 6.30 ते 9 वाजेपर्यंत ‘श्रीमद् भागवत कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.   यावेळी चंद्रकांत गव्हाणे, चिंधाजी गोलांडे, जयवंत शिंदे, आण्णासाहेब कापसे आदी उपस्थित होते.
या कार्याक्रमात भागवत कथा कार्यक्रमाचे संयोजन भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठान, जोग महाराज प्रसाद दिंडी, संत सावतामाळी ट्रस्ट आणि शिवदत्त प्रसादिक दिंडी यांनी केले आहे.  २२ जानेवारीला भागवत माहात्म्य व धुंदुकारी, दि. २३ विदुर कथा व परिक्षिती जन्म, दि. २४ भक्त प्रल्हाद चरित्र व वराह अवतार, दि. २५ गजेंद्र मोक्ष, दि. २६ श्रीकृष्ण जन्म व बाललीला, दि. २७ रुक्मिणी स्वयंवर आणि  दि. २८ रोजी सुदामा भेट या विषयावर सुश्राव्य कीर्तन कथा होणार आहेत.  रविवार दि.  29 रोजी कथाव्यास हभप ऍड. शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही वाघेरे पाटील यांनी केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button