breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील फुल विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार

– क्रोमा शोरमजवळील जागा पालिका देणार भाड्याने

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहराची वाढती लोकसंख्या व वाढत्या फुलांची मागणीमुळे परिसरात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. फुल बाजारास आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने शहरातील शगुन चौकातील जागा अपुरी पडत असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला होता. यामुळे पिंपरीतील क्रोमा शोरमजवळील महापालिकेची जागा भुई भाड्याने अकरा महिने कराराने देण्यात येणार असून फुल विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न मिटणार आहे.

पिंपरीतील शगुन चैाकात गेल्या पंधरा वर्षापासून जागेअभावी सकाळी 6 ते 9 यावेळेत भरतो. फुल बाजारात वाढत्या फुल उत्पादक शेतक-यांनी शेतीमाल पर्यायाने कमी भावाने विकावा लागत आहे. अनेक शेतक-यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 2017 पासून वेळोवेळी कायमस्वरुपी जागेची मागणी होत आहे. त्यानूसार भूमि व जिंदगी विभागाने सर्व्हेअरयांनी आयुक्तासमेवत पिंपरीतील भुखंडाची पाहणी केली. त्यातील क्रोमा शोरमजवळील स.नं.210 आरक्षण क्रमांक 117 येथील सुविधा भुखंड क्रमांक 2 च्या जागेची पाहणी करुन फुल विक्रेत्यांसाठी सदर जागा योग्य असल्याचे अहवालाद्वारे कळविले.

त्या जागेवर फुल विक्रेत्यांच्या किरकोळ स्वरुपात बदल करुन 30 ओटे व पत्राशेड उभारुन जागा देण्यात येणार आहे. त्याठिकाणी भविष्यात मल्टीस्टोरीज पार्किंगचे नियोजन असल्याने फुलबाजारासाठी तळ मजल्यावर जागा राखीव ठेवण्याचे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात सुविधा भुखंड क्रमांक 2 मधील क्षेत्र 526.31 चैारस मीटर जागेत फुल बाजारासाठी पत्रशेड उभारण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button