breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील फुलबाजाराची स्वच्छता, तक्रारीनंतर पालिकेने दाखविली सतर्कता

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी येथे नव्याने सुरू झालेल्या फुलबाजारात गेल्या अनेक दिवसांपासून चिखल आणि घाण साचली होती. त्यामुळे येथील फुल व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यास खुप अडचणी निर्माण होत होत्या. अखेर आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने येथील सर्व चिखल आणि साचलेली घाण साफ करण्यात आली. त्यामुळे व्यापार्‍यांनी देखिल पालिकेच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्रच पाऊस पडत आहे. त्यामुळे पिंपरी येथील फुलबाजारात खुपच चिखल आणि घाण साचली होती. अशातच येथील फुल व्यापार्‍यांना आपला व्यापार करावा लागत होता. परंतु, बाजार समितीचे राजू शिंदे यांनी ही बाब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली. आणि येथे साफसफाई व्हावी म्हणून पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे पालिकेच्या सफाई कामागारांनी आज फुलबाजारातील हा सर्व चिखल आणि घाण साफ करून फुलबाजार स्वच्छ केला. त्यामुळे येथील व्यापार्‍यांनी पालिकेच्या या कामाचे तसेच बाजारसमितीचे राजू शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही स्वच्छता करण्यासाठी पालिकेचे मुकादम संभाजी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बाजार समितीचे प्रशासक मधूकांत गरड यांनी शेतकरी व फुल आडत व्यापारी यांना बाजारात येणार्‍या अडअडचणी तात्काळ सोडविण्याबाबतच्या सुचना दिल्या असून त्या अनुषंगाने पिंपरी येथील फुलबाजारात येणार्‍या अडअडचणी सोडविण्यात येत आहेत. तसेच व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणींबाबत व्यापार्‍यांशी चर्चा करून त्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात येणार आहे.

राजू शिंदे, कृषी बाजार समिती पुणे, उपबाजार पिंपरी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button