breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीच्या साई चाैकात औषधाच्या गोदामाला लागली आग

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी येथील साई चौकात एका औषधाच्या गोदामाला आग लागली. ही घटना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.

साई चौकातील एका चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर औषधांचे गोदाम आहे. पावणेआठच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. गोदामातून मोठया प्रमाणात धूर येऊ लागल्याने इमारतीतील रहिवासी बाहेर आले.

याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच जवानांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान, परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button