breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पावसाळ्यात विजेच्या दुर्घटना टाळण्यास खबरदारी घ्यावी – आमदार जगताप

पिंपरी – पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे विजेसंबंधीच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करावेत, तसेच शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत न करता सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सुचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (मंगळवारी) महावितरण विभागाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत अधिका-यांना दिल्या. 
पिंपळे गुरव येथील आमदार जगताप यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी चिंचवड विधानसभा मतदार संघातील महावितरण कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच  पावसाळ्यातील विद्युत दुरूस्तीची कामे, वीज पुरवठा अधिक वेळ बंद होणे, रस्त्यातील व चौकातील वाहतुकीस, पादचा-यांना अडचणींचे ठरणारे ट्रान्सफॉर्मल, फीडर पीलर यांची बसवण्याची योग्य जागा, सध्याची स्थिती तपासणे,  नागरिकांच्या विजेसंबंधीच्या समस्या निवारण करणे आदी विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी वीज महामंडळ समितीचे  अध्यक्ष संजय मरकड, अ‍धीक्षक अभियंता (पिंपरी), कागल पूल्लीवार, कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, मदन शेवाळे, नगरसेविका आरती चौंधे, मोना कुलकर्णी, भारती विनोदे, नगरसेवक चंद्र्कांत नखाते, रामकृष्ण राणे उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button