breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पालिकेच्या सफाई कर्मचा-यांना दहा लाखांचा वैयक्तीक विमा

  • समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू
  • सफाई कर्मचा-यांना फायदा होणार

पिंपरी – महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचा-यांना 1 एप्रिल 2018 पासून अपघात विमा लागू करण्यात आला आहे. ‘समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” लागू करण्यात आली आहे. हा विमा दहा लाख रुपयांचा आहे. याचा महापालिकेत सर्व सफाई कर्मचा-यांना फायदा होणार आहे. आरोग्य विभागाच्या तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छतेच्या पुरस्कारात सफाई कर्मचा-यांचा खारीचा वाटा आहे. तरीही, महापालिकेकडून सफाई कर्मचा-यांच्या आरोग्यासह सुरक्षेकडे वांरवार दुर्लक्ष केले जात होते. अनेक कर्मचारी सुरक्षेची पर्वा न करता कचरा जमा करतात. घंटागाडी वाहनामध्ये कचरा बसत नसल्यामुळे जिवाची पर्वा न करता लोंबकळत पोती बांधून घेवून जातात. यामुळे अनेक स्वच्छता कर्मचारी खाली पडून जखमी झाल्याची उदाहणे आहेत. त्यातच कर्मचा-यांना तुटपुंजे मानधन असते. त्यामुळे कर्मचारी योग्य उपचार घेऊ शकत नाहीत.

कर्मचा-यांना आरोग्य विमा लागू करण्याची मागणी आरोग्य विभागाच्या तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी महापालिकेकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व सफाई कर्मचा-यांना 1 एप्रिल 2018 पासून अपघात विमा लागू केला आहे. ‘समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” लागू करण्यात आली असून हा विमा दहा लाख रुपयांचा असणार आहे. याचा महापालिकेत सर्व सफाई कर्मचा-यांना फायदा होणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिका-यांनी चरण यांना पत्र पाठवून अपघात विमा लागू केल्याचे कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button