breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एकूण 16 हजार 233 अर्ज प्राप्त झाले आहेत. चालू आर्थिक वर्षातील योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

महिला व बालकल्याण योजना

इयत्ता दहावीच्या मुलींना शैक्षणिक साहित्य योजनेसाठी 204 अर्ज, वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकी पदवीसारखे उच्च शिक्षण योजनेसाठी 25 अर्ज, परदेशातील उच्चशिक्षण घेणा-या युवतींना अर्थसहायासाठी 32 अर्ज, विधवा/घटस्फोटीत महिलेस घरगुती व्यवसाय करण्याच्या अर्थसहाय योजनेसाठी 3 हजार 203 अर्ज, सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी 3 अर्ज, दीड वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटाला अर्थसहाय योजनेसाठी 87 अर्ज, रामभाऊ म्हाळगी मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय योजनेच्या लाभाकरिता 10 अर्ज, 10 वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटांच्या अर्थसहाय योजनेसाठी 19 अर्ज, एका किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणा-या मिहलेला अर्थसहाय योजनेसाठी 77 अर्ज, मुलगी दत्तक घेणा-या दाम्पत्यास अर्थसहाय योजनेसाठी 4 अर्ज प्राप्त झाले आहेत.

मागासवर्गीय कल्याणकारी योजना

मागासवर्गीय युवकांना परदेशातील शिक्षण योजनेसाठी 12 अर्ज, मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना घरबांधणीसाठी अर्थसहाय योजनेकरिता 17 अर्ज, 12 वीनंतरच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी अर्थसहाय योजनेसाठी 25 अर्ज, पाचवी ते दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी 4 हजार 895 अर्ज आले आहेत.

अपंग कल्याणकारी योजना

विशेष व्यक्तींचा सांभाळ करणा-या संस्थेला व पालकांना अर्थसहाय योजनेसाठी 113 अर्ज, अपंग व्यक्तिंना उपयुक्त साधन खरेदीकामी अर्थसहाय योजनेसाठी 94 अर्ज, संत गाडगे महाराज दिव्यांग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय योजनेसाठी 23 अर्ज, डॉ. पंडित दिनदयाळ उपाध्याय 05 ते 18 वर्ष वयोगटातील शाळेत जाऊ न शकणा-या दिव्यांग मुलांना अर्थसहाय योजनेसाठी 11 अर्ज, पंडित दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते 18 वी पर्यंत) योजनेसाठी 149 अर्ज, अपंग व्यक्तींना व्यावसायासाठी अर्थसहाय योजनेसाठी 23 अर्ज, पंडित दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी 502 अर्ज, कुष्ठ पीडित व्यक्तिंना अर्थसहाय योजनेसाठी 148 अर्ज आले आहेत.

इतर कल्याणकारी योजना

पंडित दिनदयाळ उपाध्याय पहिली ते पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी अनाथ व निराधार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी 158 अर्ज, एचआयव्ही / एड्स बाधित व्यक्तिंना पीएमपीएमएल बस पास मोफत देण्याच्या योजनेसाठी 2 अर्ज, दहावी 80 ते 90 टक्के गुण घेणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेसाठी 3 हजार 348 अर्ज, शून्य ते 18 वर्ष वयातील एचआयव्ही/एड्स बाधित मुलांचा साभाळ करणा-या पालकांना किंवा संस्थांना अर्थसहाय योजनेसाठी 10 अर्ज, इयत्ता बारावी परिक्षेत 80 टक्के व त्याहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांच्या योजनेसाठी 1 हजार 276 अर्ज, ऐच्छिक अनुदान योजनेसाठी 3 अर्ज, दहावीत 90 टक्केहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थी योजनेसाठी 1 हजार 760 अर्ज प्राप्त झाले आहेत.

एकंदरीतच चालू आर्थिक वर्षात कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या कल्याणासाठी पालिका सदैव तत्पर असून नागरवस्ती विकास योजना विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या 30 प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button