breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या अंदाजपत्रकात क्रिडा विभागासाठी स्वतंत्र लेखाशिर्षक – सभापती उत्तम केंदळे

  • स्थापत्य-क्रिडा लेखाशिर्षावर 50 कोटींची मिळणार तरतूद
  • क्रिडाविषयक अत्याधुनिक विकासकामांवर देणार भर

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात क्रिडा विभागासाठी स्थापत्य-क्रिडा असा स्वतंत्र लेखाशिर्षक तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात या स्वतंत्र लेखाशिर्षावर क्रिडा विभागासाठी 50 कोटींची तरतूद ठेवण्याचा निर्णय मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्यामुळे क्रिडाविषयक विकासकामे करताना येणा-या अडचणी दूर झाल्या आहेत. या कामासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती उत्तम केंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विकासकामे करण्याच्या बाबतीत गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेतील क्रिडा विभाग मागे पडला आहे. क्रिडा क्षेत्रातील विकासकामे करण्यासाठी या विभागाला खर्चाची मर्यादा येत होती. त्यामुळे स्थापत्य-उद्यानच्या धर्तीवर क्रिडा विभागासाठी पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात स्वतंत्र स्थापत्य-क्रिडा असा लेखाशिर्षक तयार करण्याची मागणी केली होती. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी प्रशासनाकडे प्रलंबित होती. त्यावर क्रिडा विभागासाठी स्वतंत्र लेखाशिर्षक तयार करून त्यावर पाच टक्के रक्कमेची तरतूद करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापुढे नव्याने सादर केला. त्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यांनी आयुक्तांना हा प्रस्ताव मान्य करण्याची सूचना केली. त्यासाठी आपण तीन महिने सातत्याने पाठपुरावा केला. त्यावर आयुक्त हर्डीकर यांनी 2021-22 च्या अंदाजपत्रकात मागणीचा समावेश केला आहे, असे सभापती केंदळे यांनी सांगितले.

क्रिडा प्रकारानुसार मैदाने, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस, लॉन तयार करताना मोघमपणे न करता त्याचे डिजाईन आर्किटेक्चरकडून तयार झाले पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्याची आवश्यकता असते. मैदानाची लेंथ, विड्थ, डायमेंन्शन तत्संबंधीत सर्व बाबीं शास्त्रोक्त पध्दतीने आमलात आणण्यासाठी ही यंत्रणा आवश्यक असते. ती यंत्रणा स्थापत्य-क्रिडा एकत्र झाल्यामुळे प्राप्त झाली आहे. आता क्रिडा विभागाकडे आठ क्षेत्रीय कार्यालयांसह तीनशेहून अधिक कामांची यादी तयार झाली आहे. कामाचे हेड ओपन करून टोकन काढले जाईल. कोणत्या कामाला किती तरतूद करायची ते त्या-त्या कामानुसार ठरवले जाईल. परंतु, त्यासाठी आजवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. स्थापत्य-क्रिडा लेखाशिर्षामुळे अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करून क्रिडा क्षेत्रातील प्रत्येक विकासकामांमध्ये नाविन्यपूर्ण रचनात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास सभापती केंदळे यांनी दिला आहे.

————-

पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू वसाहतींमध्ये राहणा-या नागरिकांची संख्या अधिक असेल. परंतु, त्याहून अधिक सर्वसामान्य रहिवाशी आहेत. अत्यांत तळागाळातील खेळाडूंचे हित डोळ्यासमोर ठेवून क्रिडाविषयक कामांमध्ये बदल घडवून आणले जातील. अशा घटकातील खेळाडुंना खासगी अकॅडमीमध्ये सराव करणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी अत्याधूनिक पध्दतीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर भर राहील.

सभापती उत्तम केंदळे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button