breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पालिका कर्मचा-यांना मिळणार दहा हजार रुपये अग्रीम

  • सुमारे सात हजार कर्मचारी घेणार लाभ

पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त महापालिकेतील शासकीय कर्मचा-यांना 10 हजार रुपये अग्रीम देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासकीय कर्मचा-यांना नऊ महत्वाचे सण साजरे करण्यासाठी अग्रिम मंजूर केला आहे. नऊ सणांच्या यादीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचाही समावेश आहे. त्यानुसार आंबेडकर जयंतीसाठी पालिकेतील शासकीय कर्मचा-यांना प्रति कर्मचारी 10 हजार रुपये अग्रीम मिळणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांना जयंती उत्सव आनंदात साजरा करता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे पत्र प्राप्त झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रति कर्मचारी दहा हजार रुपये प्रमाणे अग्रीम मंजूर करण्यात येणार आहे. हा अग्रीम कर्मचा-यांच्या मासिक वेतनातून कपात करण्यात येणार आहे.
राजेश लांडे, मुख्य लेखापाल, महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button