breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पालघर लोकसभा पोटनिवडणूक ;उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ आमने-सामने

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपचा वाद टोकाला जाणार हे जवळपास निश्चित आहे. कारण या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेतच, शिवाय आता उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांना भाजपने पाचारण केलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकाच दिवशी म्हणजे 23 मे रोजी आमने सामने येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांची  बुधवारी 23 मे रोजी नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण केले आहे.

कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नालासोपाऱ्यात सभा घेत, शिवसेनेसह स्थानिक बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली होती. या सभेसाठीही भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, 23 मे री पोलिंसांच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनीही उडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत. नालासोपाऱ्याला 23 मे रोजी तर तर दुसरी सभा भोईसरला 25 मे रोजी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button