breaking-newsमहाराष्ट्र

पालघर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला

  • मुख्यमंत्रीही मैदानात :  भाजप-शिवसेनेत होणार मुख्य लढत 

पालघर – राज्यातील सत्ते भागीदार असलेल्या भाजप आणि शिवसेनेत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्य लढत रंगणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा पोटनिवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवार) दिवसभर पालघर दौऱ्यावर असून त्यांच्या दोन सभा होणार आहेत. सर्वच पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेकडून चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा मैदानात आहेत. तर त्यांचा सामना कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या राजेंद्र गावित यांच्यासोबत होणार आहे.

शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तर सध्या भाजप आणि शिवसेनेकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. भाजपसाठी भंडारा-गोंदिया आणि पालघरची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. कारण, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. भाजपचे लोकसभेतील संख्याबळही घटले आहे. त्यामुळे या दोन जागा राखण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button