breaking-newsमुंबई

पालघर जिल्ह्यात कोरोनाने केला 9 हजारांचा आकडा पार

पालघर: पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे तब्बल 390 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा आता 9 हजारांहून अधिक झाल्याने पालघरकरांच्या चिंतेत वाढ झाली असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 9 हजार 41 वर पोहचला आहे. तर आजवर 173 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये 2 हजार 812 कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 56 कोरोनाबाधित रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button