breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालकांची महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने

  • – शाळा इमारतीतील पोलीस आयुक्तालयाला विरोध

पिंपरी – चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीतीत पोलीस आयुक्तालय करण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. शाळा स्थलांतर करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा, या मागणीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. शाळेच्या गणवेशात आलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

डेमॉक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. मात्र, पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात पालकांनी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाची सुरुवात महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करून झाली. शाळा स्थलांतराचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर असल्याने पालकांच्या शिष्टमंडळाने सहायक आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त रजेवरून आल्यावर यासंदर्भात बैठक घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. त्यावर पुढील गुरूवारी पुन्हा निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. सचिन देसाई, राजाराम निकम, क्रांतीकुमार कडुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. किसन शेवते, संतोष गायकवाड, सतीश नायर, उमेश सणस, देविदास जाधव, राणी जाधव, मनिषा बाबर, जिजाबाई कांबळे, लक्ष्मी कांबळे, रविंद्र दिक्षित, कल्पना जाधव, अब्दुल करजगी, विकास वाघमोडे, मोहन म्हेत्रे, सुनील दावणे, सुनील कांबळे, अमीन नदाफ आदी सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button