breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ पवार, डाॅ. अमोल कोल्हेसाठी उदयनराजे निगडीत घेणार जाहीर सभा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारंसघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे जाहीर सभा घेणार आहेत.

उद्या (शनिवारी) दि.13 एप्रिलला  निगडी प्राधिकरणातील महापाैर निवास मैदानात राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक उदयनराजे भोसले यांची जाहीर सभेचे आयोजन केले आहे.  महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी राजकीय एन्ट्री घेत थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी थेट अभिनेते अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवले आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि थेट शिरुरमधून तिकीटही मिळवलं.

मावळमधून पार्थ पवार आणि शिरुरमधून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने दोन्ही ठिकाणच्या लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी कायम पराभूत होत असे. मात्र, यावेळी तगडे उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची ठरणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ आणि शिरुरमधील प्रचारही धडाक्यात सुरु केला आहे. मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button