breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ पवारांच्या रॅलीत तरुणाईचा घुमला आवाज ‘राष्ट्रवादी पुन्हा’

  • छत्रपती शिवाजी महाराज-संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना पार्थ पवारांनी केले अभिवादन
  • महाआघाडीच्या दुचाकी रॅलीचे गल्लोगल्ली स्वागत, महिला, तरुणींचा उस्फुर्त प्रतिसाद

पिंपरी ( महा-ई-न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-काॅंग्रेस, शेकाप मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवार) भक्ती-शक्ती समुहशिल्पास अभिवादन करुन दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तरुण- तरुणीनी रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या रॅलीत ‘पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ यासह आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला, ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या प्रचारगिताने रॅलीत चांगलाच उत्साह संचारला होता.

निगडीतील छत्रपती शिवाजी महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज समुहशिल्प राष्ट्रवादी कार्यकाळात बसविण्यात आले आहे. भक्ती-शक्तीचे पवित्र संगम असलेल्या ठिकाणाहून अजित पवार आणि पार्थ अजित पवार यांनी आशिवार्द करुन दुचाकी रॅली चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सुरु करण्यात आली. अजित पवार आणि पार्थ हे दोघे एकाच जिप्सी मधून रॅलीत सहभागी झाले. रस्त्याने प्रत्येक व्यक्तीला अजित पवार हे नमस्कार करत होते. अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे.

या रॅलीला काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह महाआघाडीचे हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

मावळ लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या दुचाकी रॅलीत राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे विविध गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण-तरुणींने आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला, राष्ट्रवादी पुन्हा या प्रचार गितावर कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच दुणावला होता.  अजितदादा पवार, पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या जयघोषाने सर्वंच कार्यकर्ते दुचाकी रॅलीत उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. 

पिंपरी-चिंचवड शहरावर मागील पंधरा वर्षापासून अजित पवार यांनी अधिराज्य केले. उद्योगनगरी ते स्मार्ट व क्लिन सिटी म्हणून देशपातळीवर नावारुपाला आणले. शहराच्या पायाभूत सुविधा देवून राज्यात पिंपरी-चिंचवड विकासाचे रोलमाॅडेल बनविण्यात अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी आणि चिंचवड विधानसभेवर शिवसेना-भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी-काॅंग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळून देण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष केंद्रीय केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकाळातील कामाचा लेखाजोखा आणि भाजप कार्यकाळातील परिस्थिती मतदारांसमोर मांडून मतदारांना विकास कामांचा फरक दाखविला जात आहे.

गल्ली गल्ली मै शोर है, मोदी सरकार चाेर है

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी आणि चिंचवड विधानसभेत पार्थ पवार यांची दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी पार्थ पवारांच्या जयघोष करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाना साधत कार्यकर्त्यांनी गल्ली गल्ली मै शोर है, मोदी सरकार चाेर है, अशा घोषणा देण्यात आला. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटी, महागाई, आर्थिक शिस्तीच्या नावाखाली नागरिकांची केलेले शोषण, तसेच दोन वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील केलेल्या भ्रष्टाचारामुळे भाजपवर नागरिक नाराज झाले आहेत. ना भय, ना भ्रष्टाचार, पारदर्शक कारभाराच्या चिंध्या उडाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दररोज कचरा, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यात भाजपचे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पिंपरी -चिंचवड शहरातील नागरिकांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ नारा दिला आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button