breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ चुकला म्हणून फासावर लटकवता का? – अजित पवार संतप्त

पुणे  : वारंवार विविध कारणाने पार्थ पवारला सोशल मिडीयात ट्रोल व्हावं लागत असल्याने पार्थचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारसंतप्त झाले आहेत. पार्थ राजकारणात नवखा आहे. नवख्याकडून चूका होत असतात म्हणून त्याला फासावर लटकवता का? अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणावरही सोशल मिडीयात ट्रोलिंग करण्यात आलं होतं. यानंतर मागच्या शनिवारी दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली. दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका माई काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते.

‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ असे आशीर्वाद दिले. दरम्यान, असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. याच वादग्रस्त व्यक्तीची पार्थ पवार यांनी भेट घेतल्याने पार्थवर नेटीझन्सकडून ट्रोलिंग करण्यात आले.

‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ने पार्थ पवार ट्रोल

पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाण्याचं कृत्य चुकीचंच होतं.  त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितलं. तो नवखा आहे, त्याने केलेल्या चुकीला फासावर लटकवता का? असा सवाल अजित पवारांनी केला.
‘सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावं लागतं. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती, तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झालं. अशी कबुली अजित पवारांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button