breaking-newsपुणे

पाण्याच्या रिकाम्या टँकरला आग; अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी

 पाण्याच्या रिकाम्या टँकरला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना मोशी येथील आदर्श पेट्रोल पंपाजवळ आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी येथील आदर्श पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी तीनच्या सुमारास पाण्याच्या रिकाम्या टँकरला आग लागली. घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि भोसरी अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button