breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेने पाडलेल्या बांधकामाची भरपाई द्यावी ; काची कुटुंबियांची मागणी

पिंपरी –  सांगवी येथील प्रियदर्शनीनगर परिसरातील भाऊबंदकीच्या वहिवाटीच्या तक्रारीवरून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून ही इमारत १४ मे रोजी तीन दिवसांची सलग कारवाई करून पाडण्यात आली. या इमारतीचा मिळकतकर महापालिका प्रशासनाकडे भरला जात होता. ही इमारत नियमितिकरण करण्यासाठी येथील रहिवाशी कुटुंबाची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होती.

येथील सरीता काची यांनी वहिवाट रस्त्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिका प्रशासनाकडून या इमारतीवर कारवाई करण्यात आली. मात्र, सदर इमारतीचा मिळकतकर भरला जात होता. तर नियमितिकरणाची प्रक्रिया सुरू असताना केवळ राजकीय दबावापोटी प्रशासनाकडून ही इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप येथील रहिवाशी काची कुटुंबाने केला आहे. बेघर झाल्याने यासाठी गेली चार दिवसांपासुन काची कुटुंबीय प्रशासनाकडून नुकसान भरपाई व न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलनास बसले आहेत. महापालिकेने आमच्यावर पक्षपातीपणा करून केवळ राजकीय दबावापोटी घरावर कारवाई केली, असे धरणे आंदोलनास बसलेले अमित काची,राजेश काची,धनु काची,अशोक काची यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button