breaking-newsआंतरराष्टीय
पाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्क्यांवर
इस्लामाबाद – पाकिस्तानी अर्थव्यवस्थेत मंदी आली असून त्यांचा विकास दर यावर्षी आता केवळ 5.2 टक्क्यांवर येईल असे भाकीत करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षातून पहिल्यांदाच तेथे ही स्थिती उद्भवली आहे. कृषी उत्पादनात झालेली घट, निर्मीती क्षेत्रात आलेली मंदी आणि आर्थिक बेशिस्तीमुळेच ही स्थिती उद्भवल्याची कारणमिमांसा पाकिस्तानने केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानचा विकास दर 5.8 टक्के इतका नोंदवला गेला होता. पाकिस्तानी वित्त विभागाच्या शिष्टमंडळाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली. तथापी पाकच्या मंदावलेल्या आर्थिक स्थितीबाबत नाणेनिधीने अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. नाणेनिधीकडून बेल आउट पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. तथापी त्याची त्यांनी जाहीर वाच्यता केलेली नाही.