breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तान ऊर्जा आयोगाच्या बसवर आत्मघातकी हल्ला-2 ठार 13 जखमी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान ऊर्जा आयोगाच्या बसवर झालेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात 2 जण ठार आणि 13 जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. हा हल्लेखोर एका मोटरबाईकवरून आला होता. त्याने अगोदर बसवर गोळीबार केला आणि नंतर एका स्पीडब्रेकरजवळ बसचा वेग कमी होताच बसच्या जवळ जाऊन स्वत:ला उडवून दिले.

या हल्ल्यात बसचा ड्रायव्हर आणि तेथून जात असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बसमधील 13 जण जखमी झाले. जखमींमधील बहुतेकजण पाकिस्तान परमाणू ऊर्जा आयोगाचे कर्मचारी आहेत. या आत्मघातकी हल्ल्यात बसच्या पुढील भागाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सुरक्षा दलांनी ताबडतोब येऊन घटनास्थळाची घेराबंदी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

हल्लेखोराचा कोणी साथीदार होता किंवा नाही याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र अशा प्रकारचे हल्ले तालिबानीनी यापूर्वी केलेले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाझ शरीफ यांनी या आत्मघातकी हल्ल्याची निंदा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button