breaking-newsमनोरंजन

पाकिस्तानी कलाकाराकडून स्वरा भास्कर ट्रोल

स्वरा भास्करला नेहमीच वादग्रस्त वक्‍तव्य करण्याची सवय आहे. यावेळीही तिने ट्विटरवर केलेल्या एका वक्‍तव्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. यावेळी एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ट्विटवर कॉमेंट केल्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानी ऍक्‍ट्रेस आणि व्हिडीओ जॉकी उर्वा हॉकिनने स्वरा भास्करचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोन्ही व्हिडीओमध्ये स्वरा भास्कर पाकिस्तानी कलाकारांबाबत विरोधाभासी वक्‍तव्ये करताना दिसते आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये स्वरा पाकिस्तानमध्ये मिळणारे प्रेम आणि आदरातिथ्याबद्दल खूपच कौतुकाने बोलते आहे.

URWA HOCANE

@VJURWA

Pakistan is the country that you @ReallySwara referred to,in 2015, as the “Best country you have ever visited” and it has only gotten better in the last few years in every aspect along with when it comes to having bigger hearts and welcoming our guests . 1/3

लाहोर शहर तर लंडन आणि नवी दिल्लीपेक्षाही भारी आहे, असे ती म्हणते आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये स्वरा चित्रपट विश्‍लेषकाबरोबर “वीरे दी वेडिंग’ बाबत बोलताना पाकिस्तानला एक पूर्ण असफल देश असल्याचे म्हणताना दिसते आहे. पाकिस्तानातील भाषा भारतातील बोली भाषेपेक्षा खूपच खराब आहे. तिच्या या दोन्ही व्हिडीओंना एकाचवेळी पोस्ट करून उर्वा हॉकिनने स्वराला ट्रोल केले आहे.

URWA HOCANE

@VJURWA

2/3 While you’re on this spree of empowering women,i must say you’ve become a bitter person. And all of this is odd coming from a citizen of a state that bans their own films i.e. so let’s not talk about women empowerment.

“मला काही आणखीन बोलण्याची गरज आहे का’, असे उर्वा हॉकिनने स्वराला टॅग करताना म्हटले आहे. उर्वाच्या या पोस्टनंतर भारतातील आणि पाकिस्तानातीलही अनेकांनी स्वरा भास्करला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

URWA HOCANE

@VJURWA

3/3 This only reflects on u as an ignorant person who is also quiet contradictory in her own statements. It’s not a failing state for sure but u come across as a “Failing Human Being” !!! @ReallySwara

From the citizen of the Phenomenal Pakistan 🇵🇰

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button