breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर

पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेलं हे मंदिर भगवान विष्णूचं असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं. हिंदू शाही काळातील हिंदूंनी १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते, अशी माहिती फजल खालिक यांनी दिली. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button