breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानात ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी हिंदू डॉक्टर अटकेत, तणावाची परिस्थिती

पाकिस्तानात ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी हिंदू पशुवैद्यकीय डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. एका स्थानिक धर्मगुरुने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता अटकेची कारवाई करण्यात आली. पाकिस्तानातील सिंध प्रांतात ही घटना घडली. रमेश कुमार असं या डॉक्टराचं नाव असून घटनेनंतर परिसरात तणाव आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी हिंदूंच्या मालकीच्या दुकानाची जाळपोळ केली असून रस्त्यांवर टायर जाळण्यात येत आहेत.

स्थानिक मशिदीचे धर्मगुरु मौलवी इशक नोहरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. डॉक्टर रमेश कुमार यांनी पवित्र धर्मग्रंथाची पानं फाडून त्यामधून औषधं देत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी डॉक्टर रमेश कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी रमेश कुमार यांना सुरक्षित ठिकाणी नेलं असून घटनेची रितसर चौकशी करण्यात येत आहे. सिंध प्रांत आणि कराचीत हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदू अल्पसंख्यांक असून अनेकदा त्यांना टार्गेट केलं जात आहे. वैयक्तिक शत्रुत्वातून अल्पसंख्यांकाविरोधात ईश्वरनिंदा केल्याच्या तक्रारी होत आहेत. यासंबंधी पाकिस्तान हिंदू परिषदेने तक्रारही केली होती.

१९८७ ते २०१६ दरम्यान जवळपास १४७२ जणांवर ईश्वरनिंदा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानात ७५ लाख हिंदूंचं वास्तव्य आहे. मात्र हा आकडा ९० लाख असल्याचा दावा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button