breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाकिस्तानकडून राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात नायब सूबेदार राजविंदर सिंग शहीद

एलओसीवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातील नायब सूबेदार शहीद झाले आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये राजौरीच्या नौशेरामध्ये एलओसीवर सीजफायर वॉयलेशन केले. भारतीय सैन्यातील पीआरओ (डिफेंस) लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात नायब सूबेदार राजविंदर सिंग यांना वीरमरण आले.

अधिकृत आकड्यानुसार, पाकिस्तानने यावर्षी 2700 पेक्षा जास्तवेळा सीजफायर वॉयलेशन केले आहे. मागच्या वर्षी याची संख्या 3168 आणि 2018 मध्ये 1629 होती. यादरम्यान 21 जणांचा मृत्यू तर 94 जण जखमी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button