breaking-newsपुणे

पाऊस उंबरठ्यावर!

  • कर्नाटक किनारपट्टीवरून मान्सूनची जोमाने वाटचाल

पुणे – अवघ्या तीन दिवसांपूर्वी देशात झोकात “एन्ट्री’ करणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाची दमदार वाटचाल सुरू आहे. बुधवारी कर्नाटक किनारपट्टीचा भाग व्यापल्यानंतर आता मान्सूनची पुढील वाटचाल जोमाने सुरू आहे. येत्या 24 तासांत पाऊस पूर्वोत्तर भागात प्रवेश करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा हा प्रवास असाच सुरू राहिला, तर हा पाऊस महाराष्ट्रातही वेळेत दाखल होण्याची आशा वाढली आहे.

विभागनिहाय पावसाची शक्‍यता
99%
मध्य भारत

95 %
दक्षिण भारत
93 %
ईशान्य भारत

100 %
वायव्य भारत

संपूर्ण देश ज्याची वाट पाहत असतो, तो मोसमी पाऊस यंदा नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला. तर त्याने अंदमान-निकोबार बेटांचाही भाग व्यापला. त्यानंतर अनुकूल वातावरणामुळे केरळपर्यंत त्याची वाटचाल दमदार राहिली. आता हा पाऊस कर्नाटक किनारपट्टी ओलांडून पुढील प्रवास त्याच जोमाने करण्याचा अंदाज आहे. पुढे हा पाऊस दक्षिण द्वीपकल्पात 3 जून रोजी प्रवेश करणार आहे. मोसमी पावसाच्या या सर्व वाटचालींसाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. दरम्यान, या वातावरणामुळे तामिळनाडूचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील काही भागात पावसाची शक्‍यता आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत अंदमान-निकोबार बेटे, केरळ आणि लक्षद्वीप, ओरिसातील काही भाग, कर्नाटक किनारपट्टी, नागालॅंडचा काही भाग, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल आणि सिक्‍कीम, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ आणि कर्नाटकाचा अंतर्गत भाग याशिवाय उत्तराखंड, बिहार, मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, कोकण आणि गोवा, तामिळनाडूसह अंतर्गत कर्नाटकाच्या अनेक भागात पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा दुसरा अंदाजही दिलासादायक
भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी रात्री आपला दुसरा अंदाज प्रकाशित केला. त्यातही समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. यात वायव्य भारतामध्ये या मान्सून हंगामात एलपीएच्या (लॉंग पीरियड ऍवरेज) 100 टक्के पाऊस पडेल. तर मध्य भारतामध्ये 99 टक्के, दक्षिण भारतामध्ये 95 टक्के आणि ईशान्य भारतात 93 टक्के इतका पाऊस पडेल. एलपीएच्या 96 ते 104 इतका पाऊस पडल्यास तो सामान्य गृहित धरला जातो. हवामान विभागाने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या पहिल्या अंदाजामध्ये मान्सून सामान्य म्हणजे 96 टक्के ते 104 टक्के इतका राहील, असे सांगितले होते. नव्या अंदाजात त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल, असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button