breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहिला ट्रांसजेंडर विवाह म्हणून मान्यता ; एक आगळा वेगळा विवाह सोहळा

तिरुवनंतपुरम :  केरळमध्ये देशातील एक आगळा वेगळा विवाह सोहळा गुरुवार, (दि.१०) रोजी संपन्‍न झाला आहे. सामाजिक न्याय आणि प्रेम यांचे अनोखी सांगड घालत तिरुवनंतपुरममधील नॅशनल क्‍लबमध्ये हा विवाह सोहळा झाला. या देशातील लिंग बदल करून केलेल्या पहिल्या लग्‍न समारंभास ५०० हून अधिक वर्‍हाडी आले होते. विशेष म्‍हणजे पुरुषाची स्‍त्री झालेली सूर्या आणि स्‍त्रीचा पुरुष झालेला ईशान यांच्या या विवाहाला राज्यातील पहिला ट्रांसजेंडर विवाह म्‍हणून मान्यताही देण्यात आली आहे.

ईशान हा उद्योजक आहे. तर सूर्या टीव्‍ही अँकर आहे. खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखणार्‍या सूर्या आणि ईशान यांनी सर्व सामाजिक बंधने झुगारून विशेष विवाह कायद्यानुसार लग्‍न केले. त्यांच्या या निर्णयाला काही लोकांनी पाठींबा व्यक्‍त करत स्‍तुतीही केली आहे.

समाज आणि कुटुंबीयांचा विरोध

या विवाहाला सूर्या आणि ईशानच्या कुटुंबीयांनी विरोध केला होता. केवळ लिंग बदल हिच समस्या नव्‍हती तर दोघांचा धर्मही आडवा येत होता. ईशान हा मुस्‍लिम आहे त्यामुळे सूर्याच्या कुटुंबीयांचा या विवाहास विरोध होता. त्यामुळे ईशान आणि सूर्याला विवाहासाठी खूप मोठ्या सामाजिक आणि कौटुंबिक विरोधाला सामोरे जावे लागले. दोघांनी प्रयत्‍नपूर्वक दोन्‍ही कुटुंबीयांना लग्‍नासाठी तयार केले. त्यामुळेच गुरुवार दि. १० रोजी पूर्ण पारंपरिक रीतिरिवाजानुसार हा सोहळा पार पडला.

ट्रांसजेंडर वेलफेअर बोर्डाचे सदस्य

ईशान आणि सूर्या हे दोघेही सरकारच्या ट्रांसजेंडर वेलफेअर बोर्डाचे सदस्य आहेत. सूर्या म्‍हणाली की, “तिच्या आणि ईशानच्या विवाहामुळे लोकांमध्ये ट्रांसजेंडरबद्दलचा दृष्‍टीकोन बदलेल. त्यामुळे कोणीही ट्रांसजेंडर व्यक्‍ती विवाहाच्या पवित्र बंधनात अडकू शकतील.” दरम्यान, २०१४ मध्ये सर्वोच्‍च न्यायालयाने ट्रांसजेंडर लोकांसाठी तृतीय लिंगी (थर्ड जेंडर) म्‍हणून मान्यता दिली होती. या निर्णयानंतर न्यायालयाने सरकारला अशा लोकांना समान हक्‍क आणि अधिकार देण्याची सूचना केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button